HomeUncategorizedनुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार ! ---- खा. अनुप...

नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार ! —- खा. अनुप धोत्रे

जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
ढगफुटी सदृश पावसामुळे जिल्ह्यात शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी रिसोड, मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून गेल्या आहेत. सदर नुकसानग्रस्त भागाची खा. अनुप धोत्रे यांनी काल दि. 23 रोजी पाहणी केली. झालेले नुकसान पाहता, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खा. धोत्रे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
काल दि. 23 आगष्ट शनिवारी अकोला लोकसभा मतदार संघाचे शेतकरी खा. अनुप धोत्रे यांनी रिसोड, मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघाचे प्रचारप्रमुख ऍड. नुकल देशमुख यांची उपस्थिती होती. दरम्यान, खा. धोत्रे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रिसोड तालुक्यातील शेलुखडसे, पाचंबा, गणेशपूर,पिंपरखेड, बाळखेड, महागाव आदी गावातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खा. धोत्रे यांनी प्रत्यक्ष पहिले आहे. सदर नुकसान पाहता शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणे अत्यावशक असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत असे म्हटले आहे. यावेळी उपस्थित असलेले महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश खा. अनुप धोत्रे यांनी दिले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular