स्व. गुलाबराव खडसे सर यांना वाहीली आदरांजली.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार वसंत खडसे यांचे धाकटे बंधू स्व. गुलाबराव खडसे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगामुळे पत्रकार वसंत खडसे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना धीर देण्यासाठी आज दि.७ रोजी व्हॉईस ऑफ मीडियाचे मा. तालुकाध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष विनोद पाटील बोडखे यांनी शेलुखडसे येथेल खडसे यांच्या निवासस्थानी भेट देत शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक भिकाजी पाटील नागरे, लोणी बु. येथील मा. सरपंच ज्ञानेश्वर पाटील बोडखे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, बोलतांना व्हॉईस ऑफ मीडियाचे बोडखे म्हणाले की, स्व. गुलाबराव खडसे सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक तर होतेच पण माझे जिवलग मित्र होते. एक आदर्श शिक्षक म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. एक संवेदनशील व्यक्तित्व व उत्तम माणूस आमच्यातून निघून गेला आहे. या दुःखात व्हॉईस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी वसंत खडसे यांच्या परिवारासोबत आहेत. असे बोलून पत्रकार विनोद बोडखे पाटील यांनी स्व. खडसे सर यांना ईश्वर चरणी सद्गतीमिळो अशी प्रार्थना केली व त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी खडसे परिवारातील सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सचिन दत्तराव खडसे, विठ्ठल पंजाबराव खडसे, वैभव गजानन खडसे आदींची उपस्थिती होती.
