HomeUncategorizedनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या!

जिल्हा परिषद सदस्य,अमित पाटील खडसे यांची मागणी.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यात संतत धार पावसाने थैमान घातले असून, रिसोड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळत आहे. दि. 15 आगष्ट रोजी भर जहांगीर, मोप कृषी मंडळात ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी सलग चौथ्यांदा रिसोड तालुक्यात नैसर्गिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी! अशी मागणी वाशिम जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अमित पाटील खडसे यांनी केली आहे. त्या अनुषंगाने रिसोड तहसीलदार यांच्या मार्फत सरकारकडे एक निवेदन अमित पाटील खडसे यांनी दिले आहे.
काल दि. 15 आगष्ट रोजी रिसोड तालुक्यातील भर जहांगीर आणि मोप कृषी मंडळात ढगफुटी सदृश पाऊस बरसला होता. परिणामी नदी, नाल्यांना महापूर येऊन सदर पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उभ्या पिकांसह शेत जमीनी खरडून गेल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांचे शेतीउपयोगी साहित्य पुरात वाहून गेले आहे. यावर्षीच्या खरीप पेरणीपासून सलग चौथ्यांदा सदर नैसर्गिक संकट ओढवले आहे. तर 15 आगष्ट रोजी झालेली अतिवृष्टी ही गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठी अतिवृष्टी मानली जात आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या या संकटामुळे शेतकरी संपूर्णतः हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व त्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य अमित पाटील खडसे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी कैलास पाटील खानझोडे, रवि पाटील नरवाडे, संदीप पाचरणे, विनोद खडसे, विष्णु जाधव, पुरुषोत्तम नरवाडे, रमेश सदार, गजानन तिरके, परशराम गव्हाणे, संतोष नरवाडे, विष्णु पारडे, विजय मुटकुळे आदीसह, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular