HomeUncategorizedकाँग्रेस हायकमांडचा आ. अमित झनक यांच्यावर मोठा विश्वास.

काँग्रेस हायकमांडचा आ. अमित झनक यांच्यावर मोठा विश्वास.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक समितीत महत्त्वाची जबाबदारी.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने समिती गठीत, रिसोड-मालेगावच्या विकासपुरुषाला राज्यस्तरावर मानाचे स्थान

वसंत खडसे दैनिक लोकतंत्र

वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ (विधान परिषद) निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्त्वाची निवडणूक समिती जाहीर केली असून या समितीमध्ये रिसोड – मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अमित सुभाषराव झनक यांचा समावेश करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन आदेश काढून ही समिती गठीत केली आहे.या समितीत माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबतच आ. अमित झनक, आ. साजिद खान पठाण, आ. अनिल मांगुळकर, आ. धीरज लिंगाडेमा. वीरेंद्र जगताप, माजी आमदार, मा. राहुल बोंद्रे, माजी आमदार, मा. विलास इंगोले, माजी महापौर, मा. श्रीमती स्वाती वाकेकर, उमेदवार विधानसभा निवडणूक २०२४ यांचा समावेश आहे.

आ. अमित झनक यांना संधी मिळणे हे का महत्त्वाचे?

तरुण, अभ्यासू आणि शिक्षण क्षेत्राची सखोल जाण असलेले नेतृत्व म्हणून आ. अमित झनक यांची ओळख आहे. रिसोड-मालेगाव मतदारसंघात त्यांनी केलेले शैक्षणिक व विकासाचे काम आणि शिक्षक वर्गाशी असलेला त्यांचा थेट संपर्क पाहता, काँग्रेस पक्षाने त्यांना या रणनीती समितीत स्थान देऊन शिक्षक मतदारसंघात विजयासाठी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.या नियुक्तीमुळे वाशिम जिल्हा काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ही जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular