HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठकिचे आयोजन.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठकिचे आयोजन.

मुंबई येथे शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळासह विविध महत्त्वाच्या विषयांवर होणार मंथन..

दैनिक लोकतंत्र*
मुंबई/वाशिम :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार,दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रासमोरील विविध गंभीर प्रश्न तसेच पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत विविध प्रमुख मुद्द्यावर होणार मंथन
१. महाराष्ट्रातील दुष्काळी व पाणीटंचाईची परिस्थिती आणि त्याचा शेतकरी, ग्रामीण जनतेवर होत असलेला परिणाम.
२. राज्यातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका व पुढील आंदोलनात्मक दिशा.
३.पेपरफुटी व परीक्षांमधील गैरप्रकारामुळे युवकांच्या भविष्याचे होणारे नुकसान आणि त्याविरोधातील पक्षाची भूमिका.
४. SIR बाबत सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दक्षतेने करावयाची कामे.
५. राज्यातील राजकीय सद्य परिस्थितीचा आढावा.
६. पक्ष वाढीसाठी चर्चा करणे.
तद्वतच या बैठकीमध्ये पक्षाच्या आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने आपला सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी सर्व संबंधितांनी आपली उपस्थिती अनिवार्य समजून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात केले आहे.
सदर बैठकीस मा. खासदार, मा. आमदार,मा. प्रदेश पदाधिकारी, मा. निरीक्षक, मा. प्रवक्ते,मा. सर्व जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, मा. माजी खासदार, आमदार, मा. लोकसभा व विधानसभा उमेदवार, मा. फ्रंटल अध्यक्ष व सेलचे राज्यप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular