HomeUncategorizedदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट !

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट !

पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई.

जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना कडक निर्देश…

वसंत खडसे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यात अपुऱ्या व अनियमित पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन, ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि आरोग्यविषयक उपाययोजना यांना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनातील यंत्रणांनी सतर्क राहावे आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ३० व ३४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूर्वतयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दुष्काळ व्यवस्थापनाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन.

जिल्ह्यातील प्रमुख, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular