
विनोद पाटील बोडखे
दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
रिसोड : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील श्री सखाराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोणी बु. ची विद्यार्थिनी कु.विद्या नारायण शिंदे हिने शालेय क्रीडा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
विद्या शिंदे हिने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेचे संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक कल्याण जोशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्गातून तिचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाच त्याच बरोबर जिल्ह्याच नावलौकिक वाढवावा, यासाठी तिला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.



