HomeUncategorizedसौ.कांचनताई गडकरींची माजी आ. विजयराव जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

सौ.कांचनताई गडकरींची माजी आ. विजयराव जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

जाधव कुटुंबियांकडून मनःपूर्वक स्वागत.

वाशिमच्या राजकारणात माजी आमदार पुन्हा चर्चेत.

वसंत खडसे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : सत्तेच्या राजकारणात पदे येतात-जातात, पण माणुसकीची नाती कायम राहतात याची प्रचिती आज वाशिममध्ये पुन्हा एकदा आली.
भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते ॲड. विजयराव जाधव यांच्या राहत्या घरी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या धर्मपत्नी सौ. कांचनताई गडकरी यांनी अत्यंत कौटुंबिक आणि आत्मीयतेने सदिच्छा भेट दिली.
हा केवळ औपचारिक दौरा नव्हता. घरातील प्रत्येक सदस्याची आपुलकीने विचारपूस करणे, मनमोकळा संवाद साधणे आणि खणा-नारळाने ओटी भरून झालेले जिव्हाळ्याचे स्वागत… या सर्वांनी जाधव कुटुंबातील वातावरण अक्षरशः भारावून गेले.

या भेटीमागील राजकीय संकेत काय?

वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात ॲड. विजयराव जाधव हे नितीनजी गडकरी यांचे अत्यंत विश्वासू आणि जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. गडकरी साहेबांच्या प्रत्येक राजकीय प्रवासात जाधव साहेब सावलीसारखे सोबत राहिले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या धर्मपत्नीने थेट माजी आमदाराच्या घरी जाऊन घेतलेली ही कौटुंबिक भेट, केवळ वैयक्तिक न राहता गुरु-शिष्याच्या नात्याची घट्ट वीण आजही किती मजबूत आहे, हेच अधोरेखित करते.
राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे की, आगामी काळातील वाशिमच्या राजकीय समीकरणांमध्ये ही भेट एक भावनिक आणि नैतिक बळ देणारी ठरू शकते.

निश्चितच, दिल्लीच्या सत्ताकेंद्रात असूनही जमिनीशी आणि जुन्या कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवण्याची गडकरी परिवाराची ही परंपरा वाखाणण्याजोगी आहे.

ॲड. विजयराव जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया.

या भेटीसंदर्भात प्रतिक्रिया देतांना माजी आमदार ॲड. विजयराव जाधव भावुक झाले. ते म्हणाले ” मोठेपण पदामुळे नव्हे; तर माणसांशी असलेल्या आपुलकीच्या नात्यामुळे अधिक सुंदर ठरते याचा अनुभव आज पुन्हा आला. कांचन ताईच्या साधेपणातील स्नेह, आपुलकीतील जिव्हाळा आणि आशीर्वादातील माया मनाला कायम स्पर्शून राहील. त्यांच्या भेटीने हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.”

RELATED ARTICLES

Most Popular