जय गणेश मंडळाच्या वतीने सांप्रदायिक भजन कार्यक्रम संपन्न*

दैनिक लोकतंत्र
वाशिम : तालुक्यातील अडोळी येथील सार्वजनिक जय गजानन गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य सांप्रदायिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आयोजित या भजन कार्यक्रमात गावातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि भजनाच्या सुरांवर संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7517932086*



