HomeUncategorizedवाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली खडसे कुटुंबाची भेट.

वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली खडसे कुटुंबाची भेट.

स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या मोप येथील श्री शिवाजी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले स्व. गुलाबरा रामराव खडसे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण खडसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा बिकट प्रसंगात धीर देण्यासाठी वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेलुखडसे येथे जाऊन खडसे कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोदराव नरवाडे, मुख्याध्यापक संघटनेचे रिसोड तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, नंधाना येथील मुख्याध्यापक दिनकरराव सरकटे, सवडचे मुख्याध्यापक सावसुंदर सर, खडकी सदार येथिल मुख्याध्यापक माधवराव जाधव, लिपिक माधव खडसे आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन श्रीराम खडसे आदींनी खडसे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना या संकटातून सावरण्यासाठी धीर दिला आहे. याप्रसंगी स्व. खडसे सर यांचे थोरले बंधू वसंत खडसे व मुलगा रितेश गुलाबराव खडसे यांच्याशी चर्चा करत तुमच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असा विश्वास दिला. यावेळी बोलतांना स्व. खडसे सर यांचे बंधू जेष्ठ पत्रकार वसंत खडसे यांनी मुख्याध्यापक संघाचे आभार मानले व सर्व शिक्षक बंधूंची ही साथ आमच्यासाठी खुप मोठा आधार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular