HomeUncategorizedना धर्म, ना पक्ष,फक्त एकच लक्ष_सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे !

ना धर्म, ना पक्ष,फक्त एकच लक्ष_सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे !

आज रिसोड येथे भूमिपुत्रांचा विराट मोर्चा.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
यावर्षीच्या ढगफुटी सदृश पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच हाती आलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत नुकसान भरपाईपोटी सरकार हेक्टरी केवळ 8 हजार रुपये मदत देणार असल्याचे बोलले जात आहे. ही बळीराजाची क्रूर थट्टा असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 15 हजार रुपये मदत देण्यात यावी व सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आज दि.25 गुरुवार रोजी रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चात कुठलीही राजकीय भावना न बाळगता तमाम शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे ! असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर करणार असल्याची माहिती भूमिपुत्रच्या सूत्रांनी दिली आहे.
कुठली ही राजकीय भावना न बाळगता आपण सर्व शेतकऱ्यांनी उद्या होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन हा शेतकऱ्याचा लढा प्रबळ करावा ही विनंती, एक मोर्चाने नक्की मोठा फरक पडणार नाही पण सुरवात मात्र चांगली होईल, या सर्व शासन व्यवस्थेत फक्त आणि फक्त शेतकरी च भरडल्या चालला आहे ही वास्तविकता समजून घ्या आणि शेतकरी चळवळीचा भाग बना हा आपला छोटा प्रयत्न उद्या आपल्या सर्व अडचणी दूर करेल , मग तो पिक विमा असेल पाडलेले मालाचे भाव असो किंवा महागाई असो इत्यादी बाबी चा विचार करून आपण सर्व शेतकऱ्यांनी उद्या एकत्र येऊन शेतकरी चळवळीला बळकट करू कारण याचसरकारने कर्ज माफी चे आश्वासन दिले होते, याच सरकारने हेक्टरी 13ते 18हजार कबुल केले होते , ते आता फक्त 8000 हेक्टरी देणार आहेत सोयाबीन चे भाव आणि उत्पादन खर्च याचा मेळ बसत नाही या काळात फक्त समस्या शेतकरी वर्गाला आहेत आणि त्या समस्या फक्त आपण एकत्र येऊन च दूर करू शकतो ! एकटा मराठा एक झाला तर शासन झुकले , आणि अठरा पगड जातीत विभागलेला शेतकरी एक झाला तर काय होईल याचा विचार करा ! जगाचा पोशिंदाच आज उपाशी आहे. निद्रिस्त सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular