HomeUncategorizedवाशिममधील रिसोड तालुक्यात चौथ्यांदा ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा!

वाशिममधील रिसोड तालुक्यात चौथ्यांदा ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा!

शेलुखडसे गावाला पुराचा विळखा, तर अनेक गावांचा संपर्क तुटला.

नदी – नाले एक, रस्ते जलमय जन जीवन विस्कळीत.

वसंत खडसे.
दैनिक लोकतंत्र

वाशिम : राज्यात काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाज वाशिम जिल्ह्यासाठी खरा ठरला आहे. आज दि. 15 आगष्ट रोजी सकाळी 11:30 वाजता रिसोड तालुक्यातील शेलुखडसे, मोरगव्हाण, चाकोली, बोरखेडी, पिंपरखेड, पाचंबा आदी भागात ढगफुटी सदृश पाऊस बरसाला. सतत दोन तास पडलेल्या या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेलुखडसे येथील नदी – नाले एक झाले होते. तर रहदारीचे रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी शेलुखडसे गावाचा महापुरामुळे चोहीकडून संपर्क तुटला असल्याची माहिती ग्रामस्थ्यांनी दिली आहे. गेल्या 40 वर्षातील हा सर्वात मोठा महापूर असल्याचे येथील वयोवृद्ध ग्रामस्थांनी सांगितले आहे. सदर महापुरात जमिनीचे भयंकर नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्यामुळे शेती साहित्य वाहून गेले असल्याची माहिती पुढे येत आहे. सलग चौथ्यांदा शेलुखडसे गावाला ढगफुटी पावसाने झोडपल्यामुळे येथील शेतकरी हवालदील झाले आहेत. सरकारने या नैसर्गिक संकटाची तातडीने दखल घ्यावी. व तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेलुखडसे येथील शेतकरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular