HomeUncategorizedवाशिम येथील ज्येष्ठ पत्रकारांकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन.

वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकारांकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन.

स्व. गुलाबराव खडसे यांच्या स्मृतींना दिला उजाळा.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले विज्ञान शिक्षक स्व. गुलाबराव खडसे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. परिणामी खडसे कुटुंबावर हा खुप मोठा आघात झाला आहे. घरातील एक जबाबदार व कर्ताव्यक्ती गेल्याने हतबल झालेल्या कुटुंबास धीर देण्यासाठी आज दि.८ जुलै रोजी वाशिम येथील जेष्ठ पत्रकार सुनीलजी मिसर, प्रांजलभाऊ जैन, एआयआरचे जिल्हाप्रतीनिधी सुनीलजी कांबळे, सिटीन्यूज सुपरफास्टचेआवृत्ती संपादक आतिशभाऊ देशमुख, दैनिक जनमाध्यमचे जिल्हप्रतीनिधी पप्पूभाऊ घुगे आदी विविध माध्यमांच्या मान्यवर पत्रकारांनी स्व. खडसे सर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
स्व. गुलाबराव खडसे हे केवळ एक आदर्श शिक्षक म्हणूनच नव्हे; तर सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित होते. त्यामुळे विविध क्षेत्रात त्यांचा खुप मोठा मित्रपरिवार आहे. यावेळी मान्यवर पत्रकार बंधूंनी स्व. गुलाब खडसे यांची शिक्षक म्हणून असलेली कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थीप्रिय स्वभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या कामांना उजाळा देत स्व. खडसे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दरम्यान, उपस्थित जेष्ठ पत्रकारांनी शोकाकूल वसंत खडसे व समस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. ” या दुःखात पत्रकार बंधू तुमच्यासोबत आहेत, ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी स्व. गुलाबराव खडसे यांचे थोरले बंधू वसंत खडसे यांनी सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular