HomeUncategorizedश्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष लाव्हरे सर यांच्याकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष लाव्हरे सर यांच्याकडून खडसे कुटुंबाचे सांत्वन.

स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या आठवणींना उजाळा.

दैनिक लोकतंत्र
वाशिम : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित मोप येथील श्री शिवाजी विद्यालयात विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले स्व. गुलाबराव रामराव खडसे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने शिक्षकवर्गात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधारवड हरवलेल्या खडसे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज दि.५ जुलै रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी खडसे यांच्या निवासस्थानी पोहचले.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय मा. प्राचार्य श्री. लाव्हरे सर आणि सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक आदरणीय श्री. काठोळे सर यांनी उपस्थित राहून स्व. खडसे सर यांचे थोरले बंधू जेष्ठ पत्रकार वसंत खडसे व समस्त खडसे परिवाराची भेट घेतली.
“गुलाबराव खडसे सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे लाडके आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तित्व होते. त्यांच्या जाण्याने संस्थेची मोठी हानी झाली आहे. या दुःखात संस्थेचे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक आणि आम्ही सर्व खडसे कुटुंबियांच्या पाठीशी आहोत,” असे संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्राचार्य लाव्हरे सर म्हणाले.
सेवानिवृत्त शिक्षक काठोळे सरांनी स्व. खडसे सर यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या कर्तव्यनिष्ठेची, विद्यार्थीप्रिय स्वभावाची आणि मित्रभावाने वागण्याच्या गुणांची आठवण काढत स्व. गुलाबराव खडसे सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्व. खडसे सर यांच्या पत्नी श्रीमती रेखाताई खडसे, वहिनी सौ. अनिताताई वसंत खडसे, मुलगा रितेश गुलाबराव खडसे, चि.अनुज गुलाबराव खडसे,पुतणे मनीष वसंतराव खडसे, रमेश वसंतराव खडसे व मोठे बंधू पंजाबराव नागोराव खडसे आदींची उपस्थिती होती. दुःखाने हतबल झालेल्या कुटुंबास संस्थेकडून धीर दिल्याबद्दल
खडसे परिवाराने मान्यवरांचे आभार मानले. या भावनिक प्रसंगी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

RELATED ARTICLES

Most Popular