HomeUncategorizedप्रशासनातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ठाणेदार रामेश्वर चव्हाण.

प्रशासनातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ठाणेदार रामेश्वर चव्हाण.

तब्बल ४०० रिवार्ड मिळवणाऱ्या अधिकाऱ्याला दैनिक लोकतंत्रचा सलाम..

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्याच्या पोलीस दलातील रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे एक अजब रसायन आहे. कर्तव्य पार पाडतांना कायद्याचे रक्षण, जनसेवा, समर्पण, निष्ठा आणि संघर्ष या पंचसूत्रीच्या बळावर त्यांनी प्रशासकीय सेवेतील नैतिक मूल्ये जोपासत सामाजिक बांधिलकी जपली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सर्व सामान्यांना कायद्याचा आदर करायला लावणारे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे संपूर्ण जिल्ह्यात ” सिंघम ठाणेदार ” म्हणून ओळखले जात आहेत. सन २०१९ मध्ये पोलीस महासंचालक पदक पटकावणारे चव्हाण यांनी तब्बल ४०० रिवार्ड मिळवले आहेत. उत्कृष्ट डिटेक्शन व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना प्रशस्ती पत्र व रिवार्ड देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल पोलीस दलाच्या स्मरण पुस्तिकेत घेण्यात आली आहे. सर्व सामान्य जनता आणि पोलीस यांच्यात विश्वासार्हता निर्माण करून रिसोड येथील सर्वच उत्सव डीजे मुक्त करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत प्रत्येक उत्सवात हिरारीने भाग घेतला आहे. अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यास वाढदिवसानिमित्त सिटीन्यूज सुपरफास्ट कडून आदराचा सलाम !
वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण हे मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे जिवंत प्रतीक आहेत. गणपूर या छोट्याशा खेड्यात जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहे.
गरीब खेड्यातून आलेले, संघर्षमय जीवन जगलेले, पण मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत न सोडणारे हेच चव्हाण साहेबांचे खरे वैशिष्ट्य आहे. ४०० पुरस्कारांचे मानकरी -पोलिस विभागाचा खरा अभिमान !
१९९५ हे वर्ष त्यांच्यासाठी इतिहास घडवणारे ठरले. मे. ए. सो. कॉलेज, मेहकर येथे शिक्षण घेत असताना एनसीसीच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भारताचे नेतृत्व (परेड कमांडर)
करण्याचा मिळवणारे ते पहिले विद्यार्थी ठरले.
लहान खेडे गावातून मोठ्या मंचावर देशाचं नेतृत्व करणं, हे फक्त त्यांच्यासारख्या अथक परिश्रम करणाऱ्यांनाच शक्य होतं. त्या क्षणी गणपूर गावाचं नाव दिल्लीच्या राजपथावर घुमलं हे स्वप्न आजही गावकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे.

ध्येयनिष्ठा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर गाठले यशाचे शिखर.

लहानपणी शिक्षणासाठी गणपूर ते मेहकर रोज धावत जाणं, पायात चप्पल नसतानाही स्वप्न पळवत ठेवणं, आणि थकवा, गरिबी, अडचणींवर मात करून शिकत राहणं हा प्रवास केवळ संघर्ष नव्हता, तर
जिद्दीचा ध्यास होता. आजच्या
तरुणाईला त्यांनी दाखवून दिलंय ‘मेहनतीला पर्याय नाही, चिकाटीला शॉर्टकट नाही आणि स्वप्नांना मर्यादा नाहीत. ‘अनेक गुन्ह्यांचे ऊलगडे – गुन्हेगारांसाठी भीतीचं दुसरं नाव.
न्यायालयापर्यंत पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर अनेक गुन्ह्यांचे भेदक तपास करून गुन्हेगारांना पोहोचवले. त्यांच्या तपास कौशल्यामुळे गुन्हेगारांचे साम्राज्य कोसळले आणि निरपराध लोकांना न्याय मिळाला. विशेषतः सायबर क्राईम तपासातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना ४०० पुरस्कार आणि ४४ पेक्षा जास्त प्रशंसापत्रे
मिळाली कर्तव्य, शौर्य आणि सचोटीचं हे जिवंत उदाहरण आहे.

कर्तव्यनिष्ठ अधिकारी ते कुटुंब वत्सल जबाबदारी..

अपत्यांची एमबीबीएस वाटचाल – कुटुंबाचा अभिमान, समाजासाठी प्रेरणा ठरत आहेत.
पत्नी अरुणा चव्हाण यांनी घर आणि समाजसेवेचा भार खंबीरपणे पेलत, पतीच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली. आज या दाम्पत्याच्या प्रेरणेतून दोन्ही अपत्ये एमबीबीएस शिक्षण घेत आहेत – ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर संस्कार, कर्तव्यभाव आणि शिक्षणाचा विजय आहे.
‘जे देतात कायद्याला मान, त्याचाच होतो खऱ्या अर्थाने मानसन्मान.’ रामेश्वर चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व सांगते समाजासाठी निःस्वार्थ सेवा आणि प्रामाणिक कर्तव्याने कमावलेला सन्मान हा पैशांनी नव्हे; तर कर्तव्याने मिळतो हे चव्हाण यांनी कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त दैनिक लोकतंत्र परिवाराकडून आदराचा सलाम..!

RELATED ARTICLES

Most Popular