HomeUncategorizedमांडावा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न.

मांडावा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न.

रिसोड तालुक्यात महसूल प्रसासन नागरिकांच्या दारात.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यात सुरु असलेल्या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर रिसोड तालुक्यातील मांडावा येथे उत्साहात संपन्न झाले. सदर शिबिरात मांडवा येथील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि मंडळातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. अशी माहिती महसूलचे निवासी नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी श्री. सुभाषराव जाधव यांनी दिली आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी कु. पूजा राठोड,यांच्यासह मंडळातील ईतर ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या वतीने दि. 1 आगष्ट ते 7 आगष्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे.जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतून, उप विभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात आणि तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात रिसोड तालुक्यातील 8 मंडळात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि. 4 आगष्ट 2025 रोजी मोप मंडळातील मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदर शिबीर संपन्न झाले आहे. याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेतला असल्याची माहिती श्री जाधव यांनी दिली आहे.
विविध योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी व महसूल संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खालीलप्रमाणे मंडळनिहाय महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महासराजस्व विशेष समाधान शिबिर संपन्न झाले आहेत.
दि. 4 आगष्ट रोजी मोप मंडळातील मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालय,रिसोड मंडळातील करडा येथे गजानन महाराज मंदिर सभागृह, कवठा मंडळातील चिखली येथे खंडोबा महाराज मंदिर सभागृह, गोवर्धन येथील रेणुका माता मंदिर सभागृह, आसेगाव पेन येथे गजानन महाराज मंदिर सभागृह, केनवड येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह, वाकद मंडळातील धोडप बु. येथील गजानन महाराज मंदिर सभागृह आणि भर जहांगीर येथे गणेश मंदिर सभागृह आदी ठिकाणी सदर शिबीर पार पडले असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी श्री. जाधव यांनी दिली आहे.सदर शिबिरात शेतकऱ्यांसह, शालेय विद्यार्थी, व इतर योजनांचे लाभ घेणारे लाभार्थी यांचे समाधान करण्यात महसूल प्रशासनाचा हा स्तुत्य उपक्रम लोकाभिमुक असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular