Dainik Loktantra – Dainik Loktantra https://dainikloktantra.in Dainik Loktantra News Portal Fri, 24 Apr 2026 07:14:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 ज्यांनी पैसे दिले, त्यांचे अनुदान जमा केले. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Fri, 24 Apr 2026 07:14:02 +0000 https://dainikloktantra.in/?p=2017 घरकुल योजनेत हेराफेरी, मालामाल झाले अधिकारी !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध घरकुलसबंधित योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आदी योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करतांना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचे वास्तव समोर येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले त्यांचेच अनुदान हप्ते जमा करण्यात आले अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे. परिणामी या योजनेत स्थानिक पातळीवरील काही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक व नेहमीचेच सराईत दलाल मालामाल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगांव तालुक्यात घरकुलांच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली असून पात्र लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली शासकीय निधी हडपण्यात आला असल्याची माहिती सिटीन्यूज सुपरफास्टकडे आली आहे. यात रिसोड तालुका अव्वल स्थानावर असल्याचे बोलले जात आहे. ही बाब तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांसाठी लज्जास्पद आहे. तर कर्तव्यदक्ष म्हणून नावलौकिक असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या लौकिकास कलंकित करणारी आहे. पात्र यादीत नाव समाविष्ट करण्यापासून ते थेट हप्ते बँक खात्यात जमा करण्यापर्यंत गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी ज्या गरीब लाभार्थ्यांना लाच देणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांना डावलून अपात्र, बोगस लाभार्थ्यांच्या नावाखाली घरकुल अनुदानाची खैरात करण्यात येत आहे. याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. यात ज्यांच्याकडे दहा एकरापासून पन्नास एकरापर्यंत जमीन जुमला आहे. ज्यांची टोलेजंग घर बांधलेली आहेत अशा लोकांना सुद्धा घरकुल पात्र यादीत समाविष्ट करून अनुदान देण्यात आले आहे. तर काही ठिकाणी चक्क मयत असलेल्या व्यक्तींच्या नावावर देखील घरकुल अनुदान देण्यात आले असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे जे गावात राहत नाहीत अशा लोकांच्या नावावर घरकुल मंजूर करून पहिला व दुसरा हप्ता देण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र एक वीटही रचलेली नाही. ही बाब संनियंत्रण करणाऱ्या यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्चिन्ह निर्माण करणारी आहे. या घोटाळ्यात आणि लाचखोरीत काही अधिकाऱ्यांचे विश्वासू दलाल महत्त्वाची भूमिका बजावत असून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीपासून ते गृह निर्माण अभियंता, विस्तार अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात माया गोळा करत आहेत. यामुळे शासनाच्या स्तुत्य हेतुला सुरुंग लावून गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. या गंभीर प्रकाराची तज्ञ पथकांकडून सखोल व पारदर्शक चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी तरच शासनाचा मुख्य हेतू सफल होईल असे सुजाण नागरिक बोलत आहेत. या बाबत अनेक तक्रारी देखील प्रशासनाकडे आल्या आहेत. परंतु ” आम्ही सर्व मावसभाऊ, मिळून मिसळून खाऊ..! ” हे तत्व जोपासत वरिष्ठांकडून अशा तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ” हम करें सो कायदा ” या तोऱ्यात काही अधिकारी, पदाधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी वावरत आहेत. ही बाब वरिष्ठ प्रशासनासाठी अशोभनीय आहे.

बॉक्स.

अकुशल काम, रोजगार सेवकच हडपतो दाम..!
प्रधानमंत्री आवास योजनेत व ईतर काही घरकुल योजनेत अकुशल कामासाठी मजूर लावून काम करण्याची अट आहे. यासाठी जॉबकार्ड असलेल्या मजुरांना काम मिळावे हा स्तुत्य हेतू समोर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ठराविक अतिरिक्त निधी देण्यात येतो. मात्र इथेही मोठी हेराफेरी होत आहे. रिसोड तालुक्यात काही गावातील रोजगार सेवकांनी आपल्या मर्जीतील जॉबकार्ड धारक मजुरांचे मस्टर तयार करून शासकीय निधी स्वतःच हडप केला असल्याची तक्रार दाखल झाली आहे. मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरकुलसबंधी ज्या काही योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजना केवळ भ्रष्टाचाराच्या कुरण बनल्या आहेत. हेच रिसोड तालुक्यातील महाघोटाळ्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

]]>
अष्टपैलू कर्तृत्व आणि सदाबहार व्यक्तित्वाचा रुपेरी प्रवास. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%85%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a6/ Sat, 17 Jan 2026 16:57:00 +0000 https://dainikloktantra.in/?p=2012 समाजासाठी झटणारे पत्रकार बाजड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या नावली या छोट्याशा खेडे गावातून आलेला माझा लाडका भाचा रुपेश बाजड हा जन्मतःच अष्टपैलू गुणांची देणगी सोबत घेऊन आला. त्याचे ते उत्साही, आनंदी आणि चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होत नाही. त्याचे विचार आणि कृती नेहमी समाजाच्या कल्याणासाठीच तत्पर असतात. कदाचित यामुळेच तो केवळ पत्रकारितेतच नव्हे; तर एक औषध विक्रेतापासून विविध संघटना, आणि आपले सरकार सेवा सेतूच्या माध्यमातून तो आज संपूर्ण तालुक्यात एक सच्चा समाजसेवी म्हणून ओळखला जातो. विविध क्षेत्रात काम करत असताना त्याचे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रातील गरजवंताची गरज पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. याच सेवाभावी गुणांमुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या असंख्य युवकांचे जीवन उजळलं आहे. आणि आजही तो इतरांसाठी एक प्रेरणास्रोत ठरत आहे. असे सदाबहार व्यक्तित्व असलेला आणि आमच्या व्हाईस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष पत्रकार रुपेश संजय बाजड यांच्या आज १८ जानेवारी वाढदिवसानिमित्त एका रुपेरी प्रवासाचा घेतलेला हा अल्पसा आढावा. समाजासाठी न थांबता झटणाऱ्या रुपेशला दैनिक लोकतंत्र परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या वागण्यातून समाज मोठा होतो. रुपेश पाटील बाजड हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे—जे नाव ऐकताच विश्वास, आपुलकी आणि सेवाभाव या शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो. रिसोड तालुक्यातील नावली गावात जन्मलेला हा तरुण आज संपूर्ण तालुक्यासाठी केवळ ओळखीचा चेहरा नसून आधाराचा स्तंभ ठरला आहे.
वारकरी परंपरेतून मिळालेली साधेपणा, समतेची भावना आणि माणुसकीची शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर “सेवा हाच धर्म” हा विचार ठामपणे दिसतो. संघर्ष, अडचणी आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करत त्यांनी स्वतःचे अस्तित्व उभे केले; मात्र त्या प्रवासात कधीही माणुसकी हरवू दिली नाही.
आज रिसोड शहरात ते स्वतःचे मेडिकल आणि आदर्श आपले सरकार सेवा केंद्र चालवत असले तरी त्यांची खरी ओळख ही मदतीसाठी सदैव उघड्या दाराची आहे. शासकीय कागदपत्रे, योजना, सेतू सेवा असोत किंवा एखाद्या सामान्य माणसाचा प्रश्न—“हे होईल का?” या शंकेपेक्षा “हे नक्की करून देऊ” हा विश्वास ते लोकांच्या मनात निर्माण करतात. त्यामुळेच शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम ते शांतपणे पण परिणामकारकरीत्या करत आहेत.
सामाजिक जाणीव त्यांच्या कृतीतून ठळकपणे दिसते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अन्यायाविरोधात उभे राहणे, शिवसूर्य प्रतिष्ठानद्वारे महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे किंवा गरजूंना कोणताही गाजावाजा न करता मदत करणे—या साऱ्या गोष्टी त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देतात. पत्रकारितेतही त्यांनी केवळ बातमी न लिहिता, समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला.
कार्याची दखल घेत त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या प्रवासाचे मानांकन आहेत; मात्र लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि “हा आपलाच माणूस आहे” ही भावना हा त्यांचा खरा सन्मान आहे.
आज रुपेश पाटील बाजड हे नाव केवळ व्यक्तीचे नाही, तर मूल्यांचे प्रतीक बनले आहे. समाजासाठी जगण्याचा अर्थ शब्दांत नाही, तर कृतीत कसा उतरवता येतो—याचे जिवंत उदाहरण म्हणजेच रुपेश पाटील बाजड.

ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be/ Sun, 04 Jan 2026 08:41:40 +0000 https://dainikloktantra.in/?p=2001 साई नगरीत ६ जानेवारीला होणार वितरण सोहळा.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आणि आधुनिक पत्रकारितेचे पितामह, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांचे नाव जाहीर झाले आहे. सदर पुरस्काराची घोषणा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून ६ जानेवारी रोजी साई नगरी शिर्डी येथे दिमाखदार सोहळ्यात पत्रकार बानोरे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारदिनाच्या औचित्यावर हा पुरस्कार सोहळा पार पडत असल्याने या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिभावान मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील पत्रकार, लेखक आणि माहिती अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार असल्याने हा वितरण सोहळा माध्यम क्षेत्रातील मानाचा उत्सव ठरणार आहे.
रिसोड येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे हे विधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहेत. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नाविन्याचा सतत शोध आणि घटनेचा अचूक वेध घेत वृत्तांकन करणे ही त्यांच्या पत्रकारितेची विशेषतः आहे. जवळपास तीन दशकांपासून प्रामाणिकता, पारदर्शकता आणि सत्यासाठी निडरपणे वृत्तांकन करत त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गरिमा कायम जोपासली आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या लेखणीला तलवारीची ताकद देत, पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य अव्याहतपणे केले आहे आणि आजही करत आहेत. एका आघाडीच्या दैनिकात काम करत असताना आपल्या शहरातील स्थानिक समस्यांना अधिकाधिक वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःचे पिंगळाक्षी एक्सप्रेस वृत्तपत्र सुरू केले आहे. पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना त्यांनी स्थितप्रज्ञ,ध्येयवादी, समन्वयवादी आणि एक अजातशत्रू पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक कार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या महान कार्याची योग्य दखल घेत त्यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक अद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन म्हणून ६ जानेवारी हा “पत्रकार दिन” दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि या दिवसाचे आणखी विशेष महत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ” दर्पण ” ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. अशा अतिविशेष दिवसाच्या शुभपर्वावर रिसोड येथील पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही केवळ रिसोड तालुक्यासाठीच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संत नगरी शिर्डी येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

]]>
निवडणुकीच्या तोंडावर, संभाजी ब्रिगेडचा खांदेपालट. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82/ Sun, 07 Dec 2025 17:14:24 +0000 https://dainikloktantra.in/?p=1998 जिल्हाध्यक्षपदाची धुरा गजानन खंदारे यांच्या खांद्यावर, तर जिल्हा सचिवपदी रमेश मुंजे.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून, कोणत्याही क्षणी पुन्हा नव्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून खांदेपालट केले आहेत. जिल्हा प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळणारे गजानन खंदारे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा टाकण्यात आली असून, जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेड ही गेली अनेक वर्षे एक विचारधारा म्हणून समाजाच्या प्रत्येक स्तरात रुजलेली आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार आज अशा एका गावात किंवा घरातही पोहोचलेला नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी लढणारी, शेतकरी-मजुरांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारी अशी ही चळवळ आता राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.
सत्तेची चावी हातात असली तरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे अधिक प्रभावीपणे शक्य होते, या धोरणात्मक विचारातून संभाजी ब्रिगेडने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नवीन रणनीती आखली आहे. या रणनीतीत महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी खंदारे यांना सोपवली.
या निर्णयाबाबत विभागीय अध्यक्ष गजानन भोयर म्हणाले की, “वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी गजानन खंदारे नक्कीच सक्षमतेने पार पाडतील, यात शंका नाही.
नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून आगामी निवडणुकीसाठी सज्जता दर्शवली आहे.

युतीसाठी चर्चेला सुरुवात,
इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू

संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणार आहे. विविध राजकीय पक्षांशी युतीबाबत बोलणी सुरू असून इच्छुक उमेदवारांची चाचणी देखील गतीने केली जात आहे. संघटनाची बांधणी, पक्षाची भूमिका आणि निवडणूक व्यवस्थापन पाहता खंदारे यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर
जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांना देण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर होते.
जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, विभागीय प्रवक्ता ॲड. हिरामण मोरे, विभागीय उपाध्यक्ष नितेश पोहकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, राधेशाम शिरसाठ, संतोष भिसडे, राहुल सोमटकर, विष्णु भोयर, मालेगाव तालुका अध्यक्ष विनोद जाधव, विजय जुनजारे, समाधान शिंदे, नितीन जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

]]>
स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-3/ Sun, 07 Dec 2025 16:54:01 +0000 https://dainikloktantra.in/?p=1995 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी सदार येथील स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार होते.
रिसोड तालुक्यातील खडकी (सदार) येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सदार मा .जि प शाळा खडकी सदार शाळा समिती अध्यक्ष, श्री दिलीप चोकटे ज्येष्ठ नागरिक हे होत. उपस्थितीमध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रमोद बकाल, श्री सतीश वायाळ, श्री प्रदीप वाठोरे, श्रीराम फुपाटे, श्री माधव मार्कड, श्री मंगेश कोरडे , श्री शिवाजी काका सुरूशे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमंत्रित
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रदीप वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वर्ग दहावीची कु. वैष्णवी सदार हिने आपल्या भाषणातून ज्वलंत मुद्दे आणि भारतीय संविधान याविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक,यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संविधानाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे व्यक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या गर्वाने राहू शकतात. आपल्या देशाला एकजुटीने राहण्यासाठी, विकास करण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, संविधानाची खूप मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. प्रांतवाद, भाषावाद, यांना आपल्या देशामध्ये कुठलाच थारा नाही. आपला भारत देश अखंड आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळे.हे संविधान कसे अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हीच महामानवाला खरी आदरांजली होईल असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे श्री गजानन सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी या सर्वांची विद्यार्थ्यांना खोलवर माहिती दिली . आपली कर्तव्य आपल्या जबाबदारी, आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर, तर कुठलाच वाद होणे शक्य नाही, संविधान हे आपल्या भारताला लाभलेली अनमोल देणगी आहे, त्याचे पूजन केल्यापेक्षा, संविधानामधील नियमांचे पालन करावे, भविष्यामध्ये तुम्ही चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. त्याचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा ,भारताची आन ,बाण ,आणि शान भारताचे संविधान .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात
आणि भारतीय संविधान यात कसे साम्य आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. बाबासाहेबांनी आपल्या देशातील आपल्या मातीतील, बौद्ध धम्म स्वीकारला व आपल्या करोडो अनुयायांना शांतीचा मार्ग अर्पण केला. युद्ध नको बुद्ध हवा . असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती जाधव वर्ग ९ वा हिने केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद बकाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे आमच्या विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

]]>
स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2-2/ Sun, 07 Dec 2025 16:47:00 +0000 https://dainikloktantra.in/?p=1992 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी सदार येथील स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार होते.
रिसोड तालुक्यातील खडकी (सदार) येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सदार मा .जि प शाळा खडकी सदार शाळा समिती अध्यक्ष, श्री दिलीप चोकटे ज्येष्ठ नागरिक हे होत. उपस्थितीमध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रमोद बकाल, श्री सतीश वायाळ, श्री प्रदीप वाठोरे, श्रीराम फुपाटे, श्री माधव मार्कड, श्री मंगेश कोरडे , श्री शिवाजी काका सुरूशे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमंत्रित
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रदीप वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वर्ग दहावीची कु. वैष्णवी सदार हिने आपल्या भाषणातून ज्वलंत मुद्दे आणि भारतीय संविधान याविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक,यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संविधानाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे व्यक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या गर्वाने राहू शकतात. आपल्या देशाला एकजुटीने राहण्यासाठी, विकास करण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, संविधानाची खूप मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. प्रांतवाद, भाषावाद, यांना आपल्या देशामध्ये कुठलाच थारा नाही. आपला भारत देश अखंड आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळे.हे संविधान कसे अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हीच महामानवाला खरी आदरांजली होईल असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे श्री गजानन सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी या सर्वांची विद्यार्थ्यांना खोलवर माहिती दिली . आपली कर्तव्य आपल्या जबाबदारी, आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर, तर कुठलाच वाद होणे शक्य नाही, संविधान हे आपल्या भारताला लाभलेली अनमोल देणगी आहे, त्याचे पूजन केल्यापेक्षा, संविधानामधील नियमांचे पालन करावे, भविष्यामध्ये तुम्ही चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. त्याचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा ,भारताची आन ,बाण ,आणि शान भारताचे संविधान .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात
आणि भारतीय संविधान यात कसे साम्य आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. बाबासाहेबांनी आपल्या देशातील आपल्या मातीतील, बौद्ध धम्म स्वीकारला व आपल्या करोडो अनुयायांना शांतीचा मार्ग अर्पण केला. युद्ध नको बुद्ध हवा . असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती जाधव वर्ग ९ वा हिने केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद बकाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे आमच्या विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

]]>
स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2/ Sun, 07 Dec 2025 16:37:44 +0000 https://dainikloktantra.in/?p=1989 ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी सदार येथील स्व. किसनराव सदार विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक डॉ. ज्ञानेश्वर पाटील सदार होते.
रिसोड तालुक्यातील खडकी (सदार) येथील स्व. किसनराव सदार विद्यालयामध्ये ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सदार मा .जि प शाळा खडकी सदार शाळा समिती अध्यक्ष, श्री दिलीप चोकटे ज्येष्ठ नागरिक हे होत. उपस्थितीमध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रमोद बकाल, श्री सतीश वायाळ, श्री प्रदीप वाठोरे, श्रीराम फुपाटे, श्री माधव मार्कड, श्री मंगेश कोरडे , श्री शिवाजी काका सुरूशे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमंत्रित
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणामध्ये शाळेचे शिक्षक श्री प्रदीप वाठोरे यांनी विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वर्ग दहावीची कु. वैष्णवी सदार हिने आपल्या भाषणातून ज्वलंत मुद्दे आणि भारतीय संविधान याविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक श्री माधवराव जाधव मुख्याध्यापक,यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संविधानाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे व्यक्ती आपल्या देशामध्ये मोठ्या गर्वाने राहू शकतात. आपल्या देशाला एकजुटीने राहण्यासाठी, विकास करण्यासाठी, विज्ञानवादी बनण्यासाठी, संविधानाची खूप मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. प्रांतवाद, भाषावाद, यांना आपल्या देशामध्ये कुठलाच थारा नाही. आपला भारत देश अखंड आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळे.हे संविधान कसे अबाधित राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. हीच महामानवाला खरी आदरांजली होईल असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे श्री गजानन सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी या सर्वांची विद्यार्थ्यांना खोलवर माहिती दिली . आपली कर्तव्य आपल्या जबाबदारी, आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर, तर कुठलाच वाद होणे शक्य नाही, संविधान हे आपल्या भारताला लाभलेली अनमोल देणगी आहे, त्याचे पूजन केल्यापेक्षा, संविधानामधील नियमांचे पालन करावे, भविष्यामध्ये तुम्ही चांगले नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. त्याचे विचार आपल्या जीवनात अंगीकारा ,भारताची आन ,बाण ,आणि शान भारताचे संविधान .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात
आणि भारतीय संविधान यात कसे साम्य आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. बाबासाहेबांनी आपल्या देशातील आपल्या मातीतील, बौद्ध धम्म स्वीकारला व आपल्या करोडो अनुयायांना शांतीचा मार्ग अर्पण केला. युद्ध नको बुद्ध हवा . असे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती जाधव वर्ग ९ वा हिने केले तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद बकाल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे आमच्या विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

]]>
प्रसिद्ध उद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेश. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0/ https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0/#respond Wed, 19 Nov 2025 14:28:02 +0000 https://dainikloktantra.in/?p=1958 भाजपाच्या ” गाव तिथे उद्योजक ” संकल्पनेला वेग.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
राज्यातील सांगली जिल्ह्यात येत असलेल्या मिरज तालुक्यातील सावळवाडी या दोन हजार लोकसंख्येच्या छोट्याशा गावातून सुरू झालेली रवींद्र माणगावे यांची वाटचाल आज राज्याच्या राजकीय व उद्योजकीय विश्वात एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेशाने नव्या अध्यायात दाखल झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. उद्योगक्षेत्रातील मान्यवर संतोष मंडलेचा यांच्या उपस्थितीने हा क्षण अधिक अर्थपूर्ण ठरला. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश परदेशी (पिट्याभाई), पुणे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष चेतन धोत्रे, तसेच आनंद कुंदूर, करण सुरवसे, कृणाल कडू, ॲड. अक्षय वाडकर, गजेंद्र परदेशी, ओंकार किराड, अनुराग गड्डम, अनुराग पाटील, प्रसाद भोसले आणि ऋतिक ननावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यात ‘उद्योगविकास’, ‘ग्रामविकास’ आणि ‘तरुण उद्योजकता’ या तीनही क्षेत्रांना मिळालेल्या नवसंजीवनीमुळे रवींद्र माणगावे प्रखरपणे प्रेरित झाले. विशेष म्हणजे, “गाव तिथे उद्योजक” हा त्यांचा मुख्य ध्यास—गावागावात उद्योगनिर्मिती घडवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे—याला राजकीय व्यासपीठावरून वेग मिळावा, ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न अधिक भक्कम करण्याचा संकल्प त्यांनी सोहळ्यात व्यक्त केला.
शेतकरी कुटुंबाच्या मातीतून आलेले रवींद्र माणगावे बालपणापासून ग्रामीण प्रश्नांच्या आणि सामान्य माणसाच्या संघर्षांच्या मुळाशी गेले. लोकसेवेची प्रेरणा आईकडून मिळाल्याने वयाच्या केवळ 21व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले आणि नेतृत्वाचे पहिले पाऊल भक्कम रित्या रोवले. तेव्हापासून सामाजिक कार्य, लोकसंपर्क, आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काम करण्याची त्यांची धडाडी सातत्याने वाढतच गेली.
आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून, राज्यातील हजारो नवउद्योजक घडविण्याचे मोठे ध्येय ते पुढे नेत आहेत. पण आता, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे ध्येय राज्यव्यापी “गाव तिथे उद्योजक” आंदोलन बनवून पुढे नेण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला आहे. ग्रामीण युवकांनी उद्योगक्षेत्रात उतरावे, लघुउद्योग फुलावेत, शेतीपूरक उद्योग वाढावेत आणि प्रत्येक गाव उद्योजकतेचे केंद्र बनावे—ही त्यांची जीवनदृष्टी आहे.

रवींद्र माणगावे यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे पक्षाला एक समर्पित, उद्योजकता-विकासाभिमुख, लोकांशी जोडलेला आणि कामावर विश्वास ठेवणारा नेतृत्वगुणी कार्यकर्ता मिळणे होय. त्यांच्या समावेशामुळे ग्रामीण उद्योजकतेला गती, उद्योगवाढीस चालना आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम लाभेल, अशी भावना पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे.

]]>
https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0/feed/ 0
प्रशासनातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ठाणेदार रामेश्वर चव्हाण. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87/ https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87/#respond Mon, 03 Nov 2025 13:14:18 +0000 https://dainikloktantra.in/?p=1955 तब्बल ४०० रिवार्ड मिळवणाऱ्या अधिकाऱ्याला दैनिक लोकतंत्रचा सलाम..

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्याच्या पोलीस दलातील रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे एक अजब रसायन आहे. कर्तव्य पार पाडतांना कायद्याचे रक्षण, जनसेवा, समर्पण, निष्ठा आणि संघर्ष या पंचसूत्रीच्या बळावर त्यांनी प्रशासकीय सेवेतील नैतिक मूल्ये जोपासत सामाजिक बांधिलकी जपली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सर्व सामान्यांना कायद्याचा आदर करायला लावणारे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे संपूर्ण जिल्ह्यात ” सिंघम ठाणेदार ” म्हणून ओळखले जात आहेत. सन २०१९ मध्ये पोलीस महासंचालक पदक पटकावणारे चव्हाण यांनी तब्बल ४०० रिवार्ड मिळवले आहेत. उत्कृष्ट डिटेक्शन व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना प्रशस्ती पत्र व रिवार्ड देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल पोलीस दलाच्या स्मरण पुस्तिकेत घेण्यात आली आहे. सर्व सामान्य जनता आणि पोलीस यांच्यात विश्वासार्हता निर्माण करून रिसोड येथील सर्वच उत्सव डीजे मुक्त करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत प्रत्येक उत्सवात हिरारीने भाग घेतला आहे. अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यास वाढदिवसानिमित्त सिटीन्यूज सुपरफास्ट कडून आदराचा सलाम !
वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण हे मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे जिवंत प्रतीक आहेत. गणपूर या छोट्याशा खेड्यात जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहे.
गरीब खेड्यातून आलेले, संघर्षमय जीवन जगलेले, पण मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत न सोडणारे हेच चव्हाण साहेबांचे खरे वैशिष्ट्य आहे. ४०० पुरस्कारांचे मानकरी -पोलिस विभागाचा खरा अभिमान !
१९९५ हे वर्ष त्यांच्यासाठी इतिहास घडवणारे ठरले. मे. ए. सो. कॉलेज, मेहकर येथे शिक्षण घेत असताना एनसीसीच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भारताचे नेतृत्व (परेड कमांडर)
करण्याचा मिळवणारे ते पहिले विद्यार्थी ठरले.
लहान खेडे गावातून मोठ्या मंचावर देशाचं नेतृत्व करणं, हे फक्त त्यांच्यासारख्या अथक परिश्रम करणाऱ्यांनाच शक्य होतं. त्या क्षणी गणपूर गावाचं नाव दिल्लीच्या राजपथावर घुमलं हे स्वप्न आजही गावकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे.

ध्येयनिष्ठा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर गाठले यशाचे शिखर.

लहानपणी शिक्षणासाठी गणपूर ते मेहकर रोज धावत जाणं, पायात चप्पल नसतानाही स्वप्न पळवत ठेवणं, आणि थकवा, गरिबी, अडचणींवर मात करून शिकत राहणं हा प्रवास केवळ संघर्ष नव्हता, तर
जिद्दीचा ध्यास होता. आजच्या
तरुणाईला त्यांनी दाखवून दिलंय ‘मेहनतीला पर्याय नाही, चिकाटीला शॉर्टकट नाही आणि स्वप्नांना मर्यादा नाहीत. ‘अनेक गुन्ह्यांचे ऊलगडे – गुन्हेगारांसाठी भीतीचं दुसरं नाव.
न्यायालयापर्यंत पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर अनेक गुन्ह्यांचे भेदक तपास करून गुन्हेगारांना पोहोचवले. त्यांच्या तपास कौशल्यामुळे गुन्हेगारांचे साम्राज्य कोसळले आणि निरपराध लोकांना न्याय मिळाला. विशेषतः सायबर क्राईम तपासातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना ४०० पुरस्कार आणि ४४ पेक्षा जास्त प्रशंसापत्रे
मिळाली कर्तव्य, शौर्य आणि सचोटीचं हे जिवंत उदाहरण आहे.

कर्तव्यनिष्ठ अधिकारी ते कुटुंब वत्सल जबाबदारी..

अपत्यांची एमबीबीएस वाटचाल – कुटुंबाचा अभिमान, समाजासाठी प्रेरणा ठरत आहेत.
पत्नी अरुणा चव्हाण यांनी घर आणि समाजसेवेचा भार खंबीरपणे पेलत, पतीच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली. आज या दाम्पत्याच्या प्रेरणेतून दोन्ही अपत्ये एमबीबीएस शिक्षण घेत आहेत – ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, तर संस्कार, कर्तव्यभाव आणि शिक्षणाचा विजय आहे.
‘जे देतात कायद्याला मान, त्याचाच होतो खऱ्या अर्थाने मानसन्मान.’ रामेश्वर चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व सांगते समाजासाठी निःस्वार्थ सेवा आणि प्रामाणिक कर्तव्याने कमावलेला सन्मान हा पैशांनी नव्हे; तर कर्तव्याने मिळतो हे चव्हाण यांनी कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त दैनिक लोकतंत्र परिवाराकडून आदराचा सलाम..!

]]>
https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87/feed/ 0
तत्वाशी व पक्षाशी एकनिष्ठ असलेले गौरीशंकर मुळे.. https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d/ https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d/#respond Thu, 30 Oct 2025 15:24:13 +0000 https://dainikloktantra.in/?p=1952 धाराशिव मधील नांदगाव जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
राजकीय क्षेत्रात अनेकजण पदाच्या भरवशावर स्वतःचे नाव मोठे करून घेतात, समाजात आपली ताकद वाढवतात आणि संधी मिळताच दुसऱ्या पक्षात लँड होतात. अशी कित्येक उदाहरणे आजमितीस सर्वश्रुत आहेत. मात्र त्याला अपवाद ही कित्येकजन आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मुळे परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. तोच वारसा पुढे सुरू ठेवणारे उच्चविद्याविभूषित गौरीशंकर मुळे यांनी नांदगाव जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवावी असा आग्रह सर्व सामान्य जनता करीत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाची तत्व, ध्येयधोरण तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणारे गौरीशंकर मुळे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून पदवीधर असलेले गौरीशंकर मुळे हे अभ्यासू, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य असणारे युवा नेतृत्व म्हणून धाराशिव जिल्ह्यात सुपरिचित आहेत. तत्वाशी व पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मुळे परिवाराची धाराशिव जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या परिवारातील कोणताही सदस्य कुठल्याही निवडणुकीत उमेदवार असला तर ती निवडणूक एकतर्फी ठरते असा आजवरचा अनुभव असल्याचे नांदगाव सर्कल मधील सामान्य लोक सांगतात. त्याचे कारणही साजेशे असेच आहे, संसदीय लोकशाही व्यवस्थेची जपणूक व जोपासना तद्वतच धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारांची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनात वावरतांना सर्वधर्मसमभावाची जोपासना करत या कुटुंबाने आठरा पगड जातीधर्मातील लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. तीच पत या परिवाराची काँग्रेस पक्षात सुद्धा अबाधित आहे. उच्चविद्याविभूषित असलेले गौरीशंकर मुळे यांनी किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात करून राजकीय वाटचालीस सुरुवात केली होती. त्यांच्या उत्तम कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर किसान काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. व सद्यस्थितीत ते राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या संशोधन आणि युवा धोरण विभागाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. परिणामी काँग्रेस पक्षात त्यांची वैक्तिक चांगली पकड निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी श्रेष्ठींकडे कुठल्याही संदर्भात मत व्यक्त करायचं झाल्यास कोणाही मध्यस्थीची गरज भासत नाही. त्यातच नांदगाव जिल्हा परिषद गट प्रामुख्याने मुळे यांचे वर्चस्व असलेला गट आहे. आतापर्यंत येथून जेवढ्या लढती झाल्या त्या काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच झाल्या आहेत. आणि भाजपला सडेतोड टक्कर देणारा उमेदवार म्हणून गौरीशंकर मुळे यांचे नाव समोर येत आहे. पक्षाच्या विविध पदावर काम करीत असताना मुळे यांनी सर्वसामान्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे गौरीशंकर यांनी काँग्रेसकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्राचा खुप मोठा अनुभव आहे. म्हणूनच ते संभाव्य नव्हे; तर काँग्रेसचे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या फेऱ्यात अशा उमद्या नेतृत्वाचे तिकीट काटल्या जायला नको ! अशी अपेक्षा नांदगाव सर्कल मधील सामान्य लोक व्यक्त करीत आहेत.

तीन पिढ्यांचा वारसा, हाच विश्वासाचा आरसा..

धाराशिव जिल्ह्यातील एक विश्वासू घराणे म्हणून मुळे परिवाराची ओळख आहे. गौरीशंकर मुळे यांचे आजोबा तब्बल ४० वर्षे सरपंच होते. तर वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांच्या वडिलांनी सुद्धा सहकार क्षेत्रात विविध पदे भूषविली आहेत. शेतीनिष्ठ असलेल्या या परिवाराने शेतकरी हिच जात, आणि शेती हाच आपला धर्म मानला आहे. त्यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून मुळे परिवाराचे सर्वांसोबतच स्नेहाचे व आपुलकीचे सबंध आहेत. तोच वारसा गौरीशंकर मुळे हे पुढे चालवित आहेत. त्यामुळे गौरीशंकर यांना लाभलेला तीन पिढ्यांचा वारसा हाच त्यांच्या राजकीय जीवनाचा आरसा ठरणार आहे.

]]>
https://dainikloktantra.in/uncategorized/%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d/feed/ 0